‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकलेल्या चिमुकल्या स्वराने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका साकारते आहे बालकलाकार अवनी तायवाडे. अवनी मुळची नागपूरची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. अवनीच्या आईने तिची आवड लक्षात घेऊन तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं.