Aurangabad | औरंगाबादच्या क्रांती चौकात शेतकऱ्यांचे आंदोलन | Sakal |
शेतकरी संघर्ष समितीतर्फे ‘ऊसतोड’ प्रश्नावर तसेच विविध मागण्यांसाठी क्रांती चौकात प्रतिकात्मक ऊसतोड आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात तसेच औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ५० टक्के ऊस अद्याप तोडणीवाचून शिल्लक आहे. पैठण आणि गंगापूर तालुक्यात लाखो टन उसाची तोडणी अद्याप बाकी आहे. सरकारच्या चुकीच्या आणि बेजबाबदार धोरणामुळे सदरचा प्रश्न अतिशय बिकट बनलेला आहे. गेल्या पाच महिन्यात मराठवाड्यात केवळ ५० टक्के हेक्टरवरील तोडणी झालेली आहे. उर्वरित ऊस तसाच शिल्लक आहे.
व्हीडीओ-सचिन माने
#Sakal #Aurangabad #Maharashtra #FarmerProtest #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews