मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजप आणि मनसे युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. 'भाजप मनसे युतीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील मात्र कालानुरूप पुढे काय काय घडेल हे लवकरच कळेल' असं सूचक वक्तव्य माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. जळगावामध्ये पत्रकारांशी बोलत असताना गिरीश महाजन यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देत जोरदार टीकास्त्र सोडले.