मंगळवारी राज्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक पार पडली. भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे असं ते यावेळी म्हणाले. भोंगे उतरण्यावण्याबाबत भलेही त्यांनी महाराष्ट्रात हे सुरू केलं असेल. पण कर्नाटकातही आणि अन्य राज्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने केली जात आहे. असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. "पोलिस यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडतील असं वाटत नाही," असं वळसे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.