छत्तीसगडच्या दोन सख्ख्या बहिणींची अकोल्यात धावत्या रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आहे अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मनारखेड़ रेल्वे चौकी परिसरातील. बुधवारी रात्री या दोघींनी मुंबई-कोलकाता रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. या दोघीही छत्तीसगड़ येथील रहिवासी असून रागाच्या भरात त्यांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील मनारखेड़ रेल्वे चौकी परिसरात १९ वर्षीय दोन मुलींचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. अकोल्यातील उरळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला. बेबी राजपुत आणि पूजा गिरी या दोघी एकमेकींच्या मावस बहिणी. या दोन्ही मुलींनी चार दिवसांपूर्वी आयटीआय'ला जातो असे सांगून घर सोडलं. त्यानंतर त्या दोघी घरी परतल्याच नाहीत. त्यांची शोधाशोध केल्यानंतरही त्यांचा सुगावा लागला नाही. अखेर, त्यांच्या कुटुंबीयांनी चापा पोलिस स्टेशन गाठले बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-कोलकाता रेल्वे'मध्ये पुजा आणि बेबी या दोघी प्रवास करत असताना, दोघींनी रेल्वेतून पाठोपाठ उडी मारून आत्महत्या केली आहे. यावेळी दोन्ही मुली आयटीआयच्या गणवेशात होत्या. आयटीआय'मध्ये त्यांचं कोपा'चं शिक्षण सुरु होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोपा'ची ऑनलाइन परीक्षा दिली. दरम्यांन, या दोन्ही मुलींच्या आत्महत्या नेमकं कारण अद्याप पर्यत कळू शकलेले नाही. पण या आत्महत्येला कौटुंबिक कलहाची किनार असल्याचं बोललं जातय. नेमक प्रकरण काय ? हे पोलीस तपासाअंती समोर येईलच . पण फक्त कुटुंब कलहातून किंवा नैराश्यामुळे जीवण संपवणं हा पर्याय इतका सोपा झालाय का ? यावर विचार करणं फार गरजेच आहे.