चंद्रमुखी या सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे... या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत झळकणार असून दौलत देशमानेची भूमिका आदिनाथ कोठारे साकारतोय...नुकतच अमृता खानविलकरची खास मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडने तिचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.अंकिताने सोशल मिडियावर चंद्रमुखी या सिनेमाच पोस्टर शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे यात अंकिता म्हणतेय म्मू…, मला लोकांना आपल्याबद्दल सांगण्यासारखे आणि बोलण्यासारखे खूप काही आहे. पण आज तुझा दिवस आहे आणि मी ही पोस्ट वाचणाऱ्या सर्वांना सांगू इच्छिते की, तू माझ्यासाठी एखादी स्टार नाहीस तर सेलिब्रिटी आहे. तू खरी कलाकार आहेस.