राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत होते. त्यावेळी नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झालेला होता. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.