कोरोनानंतरच्या काळात अपेडाने केंद्रीय #उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात निर्धारित केलेल्या निर्यातीच्या उद्दिष्टापैकी ९० टक्के उद्दिष्ट साध्य केलं आहे. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात अपेडासमोर २३.७१ अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट होते. त्यातील ११ महिन्यांत अपेडाने २१.५ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केलाय. एप्रिल ते जानेवारी २०२१-२०२२ दरम्यान भारताने १७४२ दशलक्ष डॉलर्सचा गहू निर्यात केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३५८ दशलक्ष डॉलर्सचा #गहूनिर्यात केला होता. गेल्या वर्षीच्या गहू निर्यातीत यंदा ३९७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.
#export, #apeda, #fruits, #importandexport, #agri, #agriculture, #agrine