आज आणि उद्या स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता सर्व राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सरकारची आर्थिक धोरणं आणि कर्मचाऱ्यांविरोधातील नियमांमुळे अखेर बॅक कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उपसलंय. त्यामुळे आज आणि उद्या कर्मचारी संघटनांच्या संपामुळे बँकांचे कामकाज होणार आहे. यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने त्यासंबंधी सर्व कामाचा निपटारादेखील याच आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे धोरण असल्यामुळे ३१ मार्च दिवशीही बँकेत सर्वसामान्यांना सेवा मिळणार नाही. यामुळे या आठवड्यामध्ये ३ दिवस बँक कामकाजाला ब्रेक लागणार आहे.
#BankStrikeinIndia #BankStrikeTomorrow #BharatBandhnews #BharatBandh #BankStrikeNews #esakal #SakalMediaGroup