आमदारांना मोफत घरे कशासाठी ? घोषणा तुम्ही करता पण जनता आमदारांना लाखोली वाहत आहे. त्यापेक्षा सर्वसामान्यांना 200 युनिट मोफत विज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा, असं मत यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधानसभेत म्हाडाच्या घरांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करणार. तसेच, ग्रामीण भागातील ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल माध्यमांवर ट्रोल झाले आहेत. त्यांच्या या निर्णयाला विरोध होत आहे. त्यात मनसेनेही आता मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर टीका केलीय