मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच झी मराठीवरील मन झालं बाजिंद या लोकप्रिय मालिकेत सातारा - वाई या भागातील प्रसिद्ध बगाड यात्रा दाखवण्यात येणार आहे. वाई येथील फुलेनगर - शहाबाग येथील अनेक वर्षांची परंपरा असलेले बगाड या मालिकेच्या निमित्ताने सगळ्यांना पाहायला मिळेल. 'मन झालं बाजींद'कलाकारांनी बावधन सारखेच बगाडं फुलेनगर वाई येथे ही होते हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य अगदी उत्तम रित्या पार पाडले आणि याची प्रचिती प्रेक्षकांना २५ मार्च ते २९ मार्च पर्यंत होईल.