एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या ऑफरनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''आम्ही भाजपाला सोडलं आहे. हिंदुस्त्वाला सोडलं नाही. सत्ता असो वा नसो आम्ही आमचं हिंदुत्व सोडणार नाही.'' ते म्हणाले, भाजपने स्वतः काही केले नाही. म्हणून दुसरा किती वाईट आहे. हे ते दाखून देण्याचा प्रयत्न करतात. उत्तर प्रदेश तुम्ही जिंकले मात्र तुमच्या जागा कमी झाल्या, असं देखील ते म्हणाले आहेत. तसेच हिंदुत्व धोक्यात आहे, असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे.