राज्यभरात सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह सुरु आहे. यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही धुळवड खेळण्याचा आनंद लुटला. रंगात रंगून साऱ्या..रंग माझा वेगळा.. असं म्हणत त्यांनी गाण्यावरही ठेका धरला. भगवा फडकवत पेडणेकरांनी पुष्पा चित्रपटातील 'ओ सामी...' गाण्यावर ठेका धरला.