विधानसभेच्या सत्रात आज ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शेतकर्यांची वीज जोडणी पुढील तीन महिने थांबविण्यात आल्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मुख्यमंत्र्यांना विनंती करत केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, या अगोदरच्या सरकार मध्ये शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची वीज कापण्याचा धाडस कोणीही केलं नाही. मात्र महा विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज कापली. इतर राज्यांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांना पूर्ण वीजबिल माफी द्यावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.