फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी आपल्याला पाठवण्यात आलेली प्रश्नावली आणि आता विचारलेल्या प्रश्नांमध्ये फरक आहे. मला आरोपी-सहआरोपी बनवता येईल, असा प्रश्नांचा रोख होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले खेळाडू आहेत, त्यांना अडकवणं सोपं नाही, लोकशाही संपलेली नाही आणि भाजप तर नाहीच नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
#devendrafadnavis, #chandrakantpatil, #mumbaipolice, #devendrafadnavis, #chandrakantpatilondevendrafadnavis, #bjp, #prasadlad,