विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तासांपासून सुरु असलेली चौकशी संपली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोलिसांनी जबाब नोंदवला. डीसीपी हेमराजसिंह राजपूत आणि एसीपी नितीन जाधव यांनी फडणवीसांचा जबाब नोंदवला. मुंबई सायबर पोलिस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दुपारी 12 वाजता दाखल झाले होते. यानंतर तब्बल दोन तासानंतर जवाब नोंदवून हे पथक बंगल्याबाहेर पडलं आहे. पोलिसांना दोन तास जबाब दिल्यानंतर फडणवीस भाजप नेत्यांशी दिलखुलास गप्पा मारताना दिसले.