दिल्लीनंतर आता आम आदमी पक्षाचे सरकार आणखी एका राज्यात येणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांना मागे टाकत बाजी मारली. त्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील हनुमान मंदिरात प्रार्थना केली.