कोल्हापूर: भारतीय युद्धकलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे देशातील पहिले सव्यसाची गुरूकुलम् वेंगरूळ (ता. भुदरगड) येथे भुदरगडच्या पायथ्याशी उभारले आहे. महाराष्ट्राची जशी शिवकालीन युद्धकला, तशीच केरळची कलायरीपट्टू, मणिपूर, तमिळनाडू, पंजाब असो किंवा प्रत्येक राज्याची एक वेगळी युद्धकला. भारतातील अशा वीसहून अधिक युद्धकला येथे शिकायला मिळतात आणि येत्या तीन वर्षांत जगभरातील सतरा भाषांमध्ये येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारंगत केलं जाणार आहे.
(व्हिडिओ: मोहन मेस्त्री)
#kolhapur #india #martialarts #martialart #selfdefence