तुमचे घराणे कोणते? या खोचक प्रश्नावर 'माझं घराणं माझ्यापासूनच सुरु होतं' हे धाडसी उत्तर देण्याची ताकद पंडित वसंतराव देशपांडे यांनी त्यांच्या गायकीतून सिद्ध केली. उन्मुक्त मोकळेपण त्यांच्या स्वरातून आणि आविर्भावातून कायमच व्यक्त होत आले आहे.
या असामान्य गायकाने शास्त्रीय संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. आणि
आता या महान कलाकाराच्या जीवनावर आधारित 'मी वसंतराव' हा चित्रपट गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महत्वाचं म्हणजे वसंतरावांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे. या चित्रपटाच्या निमित्ताने संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.