kolhapur News Updates | कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीकडून चक्काजाम आंदोलन | Sakal |
मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयाजवळ आंदोलन केलं आहे.
आज याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आज वडणगे फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात आज ठिकठिकणी स्वाभिमानीकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.
महावितरणचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, राजू शेट्टी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राजू शेट्टी यांचे सुपुत्रही या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
#KolhapurNewsUpdates #Protest #RajuShetty #Maharashtranews #Marathinews