मायबोली मराठी भाषेचा गोडवा जपण्याचा प्रयत्न मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचा मंच सातत्याने करतो आहे....स्पर्धकांना आपल्या मायबोली मराठीचा लळा तर आहेच तो द्विगुणीत व्हावा यासाठी जज आदर्श शिंदेने स्पर्धकांना मराठी भाषा दिनी मराठी पुस्तकांची अनोखी भेट दिली....सोशल मीडियाच्या काळात वाचनाची आवड कुठेतरी मागे पडतेय.
लहान मुलांमध्ये ही आवड रुजवण्यासाठी आदर्शने हा स्तुत्य प्रयत्न केला. आदर्श मुलांसाठी नेहमीच गिफ्टस देत असतो. त्यामुळे सेटवर त्याला सर्व गिफ्ट बाबा म्हणतात....
पण आदर्शने पुस्तकांची दिलेली ही खास भेट प्रत्येकाच्याच मनात आणि घरात कायम जपली जाईल.