अनन्या पांडे तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या गेहराहियाँ या सिनेमामुळे खूपच उत्साहित आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनन्याला सांताक्रुझमध्ये स्पॉट केलं गेलं. त्यावेळी ती अशी चॉकलेटी लुकमध्ये पाहायला मिळाली. चॉकलेटी रंगाचं ब्लेझर, चॉकलेटी रंगाचा स्कर्ट इतकंच नव्हे तर तिच्या सॅंडलचा रंगही चॉकलेटीचं होता. याआधी तिने 'स्टुडंट ऑफ द इयर 2', 'पती पत्नी और वो', या चित्रपटात काम केलं आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील स्पॉट झाला. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. 'शेरशाह' चित्रपटाच्या यशानंतर लवकरच त्याचा 'योद्धा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. योद्धा व्यतिरिक्त सिद्धार्थ 'थँक गॉड' या चित्रपटात झळकणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा चाहत्यांसोबत कूल अंदाजात फोटो काढताना पाहायला मिळाला.