सांगली - उसाच्या एफआरपी (FRP) आणि वीज कनेक्शन तोडणीवरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्वाभिमानीकडून (Swabhimani Shetkari Sanghtana) हा पुतळा काढून घेतल्याने भर मोर्च्यात रस्त्यावर धक्काबुक्की झाली आहे. दरम्यान, कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. सरकारचे रक्षकच, भक्षक बनले असून जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) याला जबाबदार असल्याचा हल्लाबोल राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला आहे.
#SangliNewsUpdates #SangliLiveUpdates #Sangli #RajuShettyLatestNews #RajuShetty #ThackeraySarkar #UddhavThackeray #FRP #MarathiNews #esakal #SakalMediaGroup