Sunny Leone Fraud l सनी लिओनीचा Cibil Score खराब कुणी केला? l Sakal

Sakal 2022-02-18

Views 91

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला ऑनलाईन फसवणुकीचा धक्का बसलाय. नकळत कुणीतरी आपल्या पॅनकार्डचा वापर करुन धनी Appवरुन 2 हजार रुपयांचं कर्ज घेतलं. ज्यामुळे आपला Cibil Score खराब झाल्याचा आरोप सनी लिओनीनं केलाय. सनीनं ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याचबरोबर कर्ज देणाऱ्या कंपनीवरही सनीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
मात्र, नंतर काही वेळातच सनीनं संबंधित कंपनीला टॅग करत त्यांना ऑनलाईन व्यवहारासंबंधी सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.
सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वापरकर्ते इंडियाबुल्सच्या फिनटेक प्लॅटफॉर्म धनी स्टॉक्स लिमिटेडवर कर्जाच्या फसवणुकीची तक्रारी करताना दिसत आहेत.
त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधान...
सार्वजनिक ठिकाणी महत्वाची कागदपत्रं उघडतानाही खबरदारी घ्या...
जेणेकरुन तुमच्या डॉक्युमेंट्सचा कुणीही दुरुपयोग करणार नाही.
Actor Sunny Leone claims identity theft, Sunny Leone alleges her PAN card used for loan fraud, Sunny leone tweets about loan fraud, Sunny Leone victim of Loan Fraud.

#SunnyLeone #SunnyLeoneFraud #IndiaBullsApp #DhaniApp #SunnyLeoneTweet #SunnyLeoneNewsaboutDhaniApp #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form