Chhatrapati Shivaji Maharaj l औरंगाबादेतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा, नियमावलीत शिथिलता

Sakal 2022-02-18

Views 216

औरंगाबाद (Aurangabad) शहरातील क्रांती चौकात उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे रात्री १०.०० ते १२.०० वाजेदरम्यान अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाइन सहभागी होतील. तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे हे प्रत्यक्षात उपस्थित राहणार आहेत. क्रांती चौकात ३ कोटी ५३ लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभारण्यात आलाय. त्यासाठी ३१ फूट उंचीचा चौथरा उभारण्यात आलाय. त्यावर तब्बल ७ मेट्रिक टन वजन असलेला आणि २१ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्यामुळं शिवरायांचा पुतळा ५२ फूट उंचीचा झालाय.
Chhatrapati Shivaji Maharaj’s statue ceremony will be held in Kranti Chowk, Aurangabad

#ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti #ShivajiMaharaj #AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #ShivajiMaharajStatueCeremony #AurangabadShivajiMaharajStatueCeremony #UddhavThackerayLatestNews #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS