'अरे हे काय कपडे घातलेस? उर्फी जावेदच्या विचित्र फॅशनवर पडतोय प्रश्नांचा पाऊस

Maharashtra Times 2022-02-15

Views 14

बिग बॉस फेम टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या बोल्डनेससाठी खूपच प्रसिद्ध आहे. उर्फीला अतरंगी फॅशनसाठीही ओळखले जाते. ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. यावेळी उर्फी पून्हा एकदा बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात लंच डेटसाठी जाताना स्पॉट झाली. यावेळी उर्फीच्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती ब्लू रंगाच्या ओपन बॉडीसूटमध्ये दिसली. तिच्या अतरंगी फॅशनमुळे तिला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. उर्फी जावेदच्या विचित्र फॅशनमुळे तिच्या सोशल मिडियावर चाहत्यांकडून प्रश्नांचा पाऊस पडतो. याशिवाय उर्फी 'कच्चा बदाम' या ट्रेंडिंग गाण्यावरही डान्स करताना पाहायला मिळाली. तिने 'बडे भैया की दुल्हनिया' मधील अनवी पंतच्या भूमिकेतून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS