काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन केले होते. काही दिवसात याला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी "आदित्य ठाकरे मुर्दाबाद", "महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद" अशा घोषणा देण्यात आल्या.