शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट म्हणत. आता मनसेने थेट राज ठाकरे यांनाच हिंदुहृदयसम्राट म्हणण्यास सुरुवात केली आहे. आज घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन आहे. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. आता मनसेने शिवसेनेचा हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता. त्यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी हिंदूहृदयसम्राट म्हटल्याने या बॅनर्स ची चर्चा होत आहे.