बॉलिवूड कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी नुकतंच लग्न केल्याने दोघांची चर्चा सोशल मीडियावर अधिक असते. दोघेही एकमेकांचा हात धरून चालताना दिसले. क्षणभर दोघांनीही एकमेकांचा हात सोडला नाही. दोघांनीही मास्क घातलेला आहे, जीन्स आणि शर्ट घातलेला असून हातात हात घालून नेमके गेले कुठे असा प्रश्न अनेकांना पडलाय. लग्न केल्यापासून दोघांनाही चांगलीचं प्रसिद्धी मिळाल्याचे सोशल मीडियावर त्यांचे चाहते अधिक वाढले आहेत. नुकतंच लग्न झालेलं जोडपं एअरपोर्टवर दिसल्याने अनेकांना प्रश्न पडला आहे की हे जोडपं नेमकं कुठं निघालं आहे. कारण हे जोडपं लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेन्टाईन्स डे' कुठे साजरा करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. दोघांनीही करिअरमध्ये यश मिळवलं असल्याने त्यांचा चाहता वर्ग सुध्दा त्यांना कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतो.