बिग बॉस फेम उर्फी जावेद अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे तिला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यावेळी उर्फी पून्हा एकदा बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात रेस्तराँबाहेर स्पॉट झाली. यावेळी तिच्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती ऑल इन ब्लॅक रंगाच्या ओपन बॉडीसूटमध्ये दिसली. ती नेहमीच पॅपराजींशी बोलताना स्वतःच्या अतरंगी फॅशनवर कमेंट करताना पाहायला मिळते.