अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी काम करत जनजागृती करत असतात. ७३वा प्रजासत्ताक दिन सयाजी शिंदे, मनोज वाजपेयी आणि लेखक अरविंद जगताप यांनी निसर्गाच्या सान्निध्यात साजरा केला आहे. आज सर्वांनी एकत्र येत जंगलात वृक्ष लागवड केली. निसर्गाविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सयाजी शिंदेंच्या प्रत्येक उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. आज ही त्याच प्रकारे प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात अभिनेते मनोज वाजपेयी यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यामातून त्यांचा निसर्गाविषयीचा जिव्हाळा व्यक्त केला.