Kathak maestro Pandit Birju Maharaj passes away l पद्मविभूषण पंडीत बिरजू महाराज यांचं निधन l Sakal
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्मविभूषण पंडीत बिरजू महाराज यांचं आज निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती नात रागिनी महाराज यांनी दिली. बिरजू महाराजांनी कथ्थक नृत्यप्रकारातील लखनौ घराण्याचं नाव जगभर प्रसिद्ध केलं. पंडीत बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरं नाव पंडीत बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.
#BhirjuMaharaj #KathakMasterBhirjuMaharaj #BhirjuMaharajPassesAway #NewDelhiNewsUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup