नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. यासाठी प्रशासनाकडून कोणतीच परवानगी घेतली नसल्याने प्रशासनाने तो पुतळा तत्काळ हटवला. यामुळे राणा समर्थकांसह नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत, उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा सुरू केल्या. अमरावतीतला हा हायव्होल्टेज ड्रामा सध्या राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी राणा दांपत्याला त्यांच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवलं होतं. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, जे शिवभक्त परवानगी मागून थकले त्यांना परवानगी मिळाली नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाच्या परवानगी कशाला हवी? उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतदान मागतात, ते छत्रपती शिवाजी महाजांचे पुतळे हटवता. ज्या महाराजांच्या मुळे महाराष्ट्र घडला, मात्र आता कुठे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श, कुठे गेले बाळासाहेब ठाकरेंचे विचार? कुठे चाललाय माझा महाराष्ट्र म्हणत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.