नववर्षाच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यात करोनाचा कहर सुरू होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून करोना नियंत्रणात आल्याचे चित्र असतानाच, महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी वेगळीच भीती व्यक्त केली आहे. करोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र मुंबईत तरी दिसत आहे. मात्र हाच आकडा पुढे कमी होईल की जास्त होईल हे आत्ता सांगणं कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी आपल्याला आणखी दहा दिवस वाट पाहावी लागेल तसेच सद्या बूस्टर डोस घेणं हे अत्यंत महत्त्वाचा आहे असंही ते म्हणाले आहेत. तसेच वाढत्या करोनाच्या पार्श्नभूमीवर घरी राहा आणि सुरक्षित राहा. आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. गर्दी करणं टाळा असं आवाहनही डॉ. राहुल पंडित यांनी या चर्चेमधून केले आहे. पाहा स्पेशल मुलाखत विथ डॉ. राहुल पंडित...