राहुल वैद्य हे आज एक लोकप्रिय नाव बनलं आहे. तो सोशल मीडियावरसुद्धा खूप सक्रिय असतो. 'इंडियन आयडॉल १' पासून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख 'बिग बॉस १४'ने मिळवून दिली. हिंदी मनोरंजनसृष्टीत आपली ओळख बनवणारा राहुल वैद्य एक मराठी मुलगा आहे. त्यानं लोकांची मन जिंकली आहेत. राहुलने दिशा परमारला बिग बॉसच्या घरात प्रपोज केले होतं, आत्ताच या स्टार जोडीचं लग्न देखील पार झालं.