बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशनने वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या ‘विक्रम वेधा’ या सिनेमाची तारीख जाहीर केली आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबर 2020 ला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. वाढदिवसानिमित्त या चित्रपटामधील त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या फर्स्ट लूकचे प्रदर्शन, टी-सिरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारे हृतिकच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे. हृतिक लवकरच या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सिनेमात अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री राधिका आपटे पाहायला मिळणार आहे. या सिनेमात हृतिक ‘वेधा’ या गँगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात हृतिक एकदम डॅशिंग आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार असून, त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.