मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या टिप्पणीवर शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. त्या म्हणाल्या की, महिलांवरील आक्षेपार्ह विधानाला भाजपा महिला नेत्याचं समर्थन करत आहेत. महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहेत का? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असं असल्यास स्पष्ट करावं. असं शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.