पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वाढती रुग्णसंख्या विचारात घेता त्यांना आवश्यक असलेला आॅक्सीजनचा पुरवठा, बेड्स ची सुविधा किंवा इतर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यास पालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष भरती यांनी दिली आहे.
#covidcenter #covidnews #coronathirdwave #coronanewsupdates #punecovidcases