नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून जवळपास 16 लाखांहून अधिक कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे. शिवसेना वचननामा देते, आणि ती पाळते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईकरांना 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं वचन 2017 साली दिलं होतं. ते आता शिवसेनेनं पाळलं."