भाजपच्या सिद्धीविनायक पॅनेलचे प्रमुख व भाजप जिल्ह्याध्यक्ष राजन तेली याचा जिल्हा बॅंक निवडणुकीत पराभव झाल्याने राजन तेली यांनी भाजप जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला असला तरी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन तेली यांचा पराभव झाला. पतसंस्था मतदारसंघातून राजन तेली आणि शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यातील लढतीत नाईक यांनी तेली यांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनलने बाजी मारली.