#'NoraFatehiCoronaPositive #Covid19 #ActressNoraFatehi #MaharashtraTimes
8 डिसेंबरला झालेल्या रिपोर्टमध्ये नोरा फतेही करोना पॉझिटिव्ह आढळली.‘दिलबर… दिलबर…’या सुपरहिट गाण्यासह अनेक चित्रपटांमध्ये ती डान्स करताना दिसली. नोराने करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करीत दिली. त्यामुळे तिने डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वतःला क्वारंटाईन केल्याची माहिती दिली. नोराने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले,'मला करोनाची लागण झाली आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि नियमांचे पालन करा. मास्कचा वापर करा. करोना वेगाने पसरत आहे. आरोग्यापेक्षा महत्वाचे काहीच नाही. '