Hingoli : लग्न पत्रिका वाटल्या हजार; आता १०० च्या मर्यादेत कोणाला बोलवणार?

TimesInternet 2021-12-30

Views 0

#WeddingMagazine #CoronaVirus #OmicronVariant #MaharashtraTimes
ओमायक्रोन चे संकट लक्षात घेता लग्नसराईवर पुन्हा एकदा गदा आलीये. लग्न सोहळ्यासाठी आता 100 जणांनाच परवानगी देण्यात आलेली आहे. बंदिस्त सभागृहात १०० पेक्षा जास्त लोकं नको,तर खुल्या जागेत २५० जण अशी मर्यादित संख्या सांगण्यात आलेली आहे.या मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना राज्याला दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा लग्नसराईमध्ये वर - वधू पित्यांना छापलेल्या लग्नपत्रिका घरात ठेवण्याची वेळ आली आहे... पण या सर्वांचा परिणाम मंडपवाल्यांपासून ते बॅंडवाल्यांपर्यंत झाला आहे. त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अगोदरच दोन वर्षापासून मंगल कार्यालय बंद होते. त्यामुळे बँड, डीजे, मंडपवाले,घोडीवाले, व्यवसायिक यांच्या वर मोठे संकट ओढवलं होतं. आता कुठे सुरुळीत सुरु होत असतानाच ओमायक्रोनच्या संकटामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लागले आहेत. त्यामुळे ही मंडळी पुन्हा एकदा चिंतेच्या गराड्यात अडकली आहे, त्यांनी मांडलेली त्यांची व्यथा त्यांच्याच तोंडून ऐकूयात.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS