राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’ने तयार केलेल्या ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती डॉ. बाबा कल्याणी यांच्या हस्ते बुधवारी झाले. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी पवार यांची मुलाखत घेतली, त्यावेळी, भाजपासोबत अजित पवारांना शरद पवार यांनीच पाठवले या चर्चांवर शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी पाठवले असते तर अजित पवार यांनी भाजपासोबत सरकारच बनवलं असतं, असं अर्धवट काम केलं नसतं असं शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान यासंबंधी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केला आहे.
#SanjayRaut #SharadPawar #AjitPawar #BJP #Shivsena #NCP