साताऱ्यात (Satara) उदयनराजेंचा (Udayanraje Bhosale) अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात पाहायला मिळाला. उदयनराजेंच्या एका चाहत्यानं आपल्या ओपन ऑडी कार मधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली. मग काय? विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये (Audi Car) स्वार होत सातारा शहरामधून अर्धा तास फेरफटका मारला. चाहत्यांनी त्यांचा Video रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय. चारचाकी इतकेच त्यांना दुचाकी वेगात चालविण्याची प्रचंड आवड आहे. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#satara #sataranews #udayanraje #udayanrajebhosale #audi