#दहिसर पश्चिम गुरुकुल बिल्डिंग जीएस रोडवर असलेल्या स्टेट बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली होती. स्टेट बँकेवरील दरोड्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा दरोडा म्हणजे सरकारचा निष्काळजीपणा असल्याचं दरेकरांनी म्हटलं.'ग्राहकांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार?' असा सवाल उपस्थित करत दरेकरांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला.