Sameer Wankhede l समीर वानखेडे जातीच प्रमाणपत्र खोट? l Sakal

Sakal 2021-12-29

Views 7.4K

Sameer Wankhede l समीर वानखेडे जातीच प्रमाणपत्र खोट? l Sakal

समीर वानखेडे ज्यांना आज जातवैधता प्रमाणपत्र जात दक्षता समितीकडे सादर करायचे होते त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. आता 18 जानेवारी 2022 ला पुढील सुनावणी होणार आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी (Sameer Wankhede) मंगळवारी जात पडताळणी समितीला सांगितले आहे की, समितीने मागितलेले जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही. एससी प्रवर्गात (SC Category) नोकरी मिळवण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्राचा वापर केल्याच्या आरोपाखाली वानखेडे यांच्यावर चौकशी करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान तक्रारदार अशोक कांबळे आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे वकीलही उपस्थित होते.
तर, “वानखेडे यांनी आणखी वेळ मागितला आहे आणि त्यांनी समितीला सांगितले की त्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही,” अशी माहिती अशोक कांबळे यांच्यासाठी असलेले वकील नितीन सातपुते यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. ते पुढे म्हणाले की, वानखेडे यांनी त्यांच्याकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्याचे रेकॉर्डवरील समितीला कळवले असल्याने, आता या प्रकरणाची अधिक चौकशी करण्याचे अधिकार scrutiny committee आहेत. पुढे सातपुते यांनी माहिती दिली की, “जर वानखेडे यांनी वैधता प्रमाणपत्र दाखवले असते, तर हे प्रकरण या समितीच्या अखत्यारीत आले नसते, तर मुंबई उच्च न्यायालयात गेले असते.
मात्र, समितीने मागितलेली इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांनी आणखी मुदत मागितली आहे. 18 जानेवारी 2022 रोजी यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे, त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत ते सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.” असे वानखेडेचे यांचे वकील रामचंद्र राणे यांनी सांगितले आहे.

#SameerWankhede #NCB #AryanKhanDrugsCase #MarathiNews #NawabMalik #SameerWankhedeCaste #CasteCertificateofSameerWankhede #MaharashtraPolitics #Rajkaran #esakal #SakalMediaGroup

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS