31 डिसेंबर रोजी रात्री साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सुचनेनंतर श्रीसाईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री भविकानां दर्शनासाठी साई समाधी मंदीर उघडे ठेवले जात होते. मात्र या वर्षी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना असंख्य साईभक्तांचा हिरमोड झाला आहे.