महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सध्या भर थंडीतही चांगलंच तापलंय... राज्यपालांकडे अडकून पडलेली आघाडीच्या १२ आमदारांची यादी, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन यावरून कुरघोड्यांचं राजकारण तर पाहायला मिळालंच. पण त्याचसोबत एकमेकांवर टीका करण्याचा घसरलेली पातळीही समोर आली... नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना उद्देशून केलेलं म्याव म्याव तर चर्चेचा प्रचंड मोठा विषय ठरला... यावरून लोकप्रतिनिधींच्या बेशिस्तीचा अजित पवारांनी भर सभागृहातच अनेकदा खरपूस समाचार घेतला. आज तर अजितदादांनी आमदारांच्या शिस्तीबाबत अनोखी कार्यशाळाच घेतली. ३०-३५ वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती, आता कामकाज लाईव्ह होतं. त्यामुळे आपली वागणूक महाराष्ट्रातील जनतेला दिसत असते. त्यामुळे संयम पाळत अदबीने वागायला हवं. असं म्हणत अजित पवारांनी आमदारांचे कान टोचले. आमदार झालो म्हणजे आपल्याला सारे कळते, असे अनेकजण वागू लागले आहेत, अशी टीका अजित पवारांनी थेट सभागृहातच केली. अजितदादा आक्रमकपणे आणि सडेतोड बोलत असतानाच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मान ठेवण्याबाबत आमदारांना चांगलंच ठणकावलंय. पाहूयात, अजित पवार काय म्हणालेत. (Ashvin VO) Assembly members must follow parliamentary norms: Ajit Pawar.
#lokmat #UddhavThackeray #AjitPawar ajit pawar uddhav thackeray
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat