#आपल्या बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिध्द असलेले, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात आणि हसून हसून लोटपोट होतात असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालनेकरांना काही दिवसांपूर्वी एक आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन होतं जालना ते पुणे नवी रेल्वेगाडी चालू करण्याचं. लोक कदाचित हा विषय विसरले असतील, पण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी हे आश्वासन चांगलंच मनावर घेतलं आणि मार्गी लावलं.