#SocialConnectGroup #Cycle #DistributedCycles #MaharashtraTimes
धनगरवाड्यातल्या मुली दगड धोंड्यांच्या रस्त्यांवरुन त्या पायपीट करुन शाळेला जायच्या. या मुलींच्या शाळेकडे जाणारा मार्ग प्रशस्त आणि सुखकर व्हावा यासाठी सोशल कनेक्ट ग्रुपने एक अनोखा उपक्रम राबवलाय. धनगरवाड्यातील वीस मुलींना सायकल देऊन सरत्या वर्षाला निरोप देताना एका चांगल्या कामाचा पायंडा पाडला. गगनबावडा तालुक्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. हा तालुका डोंगराळ असून इथली कुटुंबे मिळेल ते काम करुन आपली कुटुंबांची गुजराण करतात. तालुक्यातील वेसरफ तालुक्यातील धनगर वाड्यातील सर्व कुटुंबाची परिस्थिती जेमतेम आहे. मात्र मुलींना शिक्षणाची गोडी लागल्याने धनगरवाड्यापासून दोन ते तीन किलोमीटर पायपीट करुन त्या शाळेला जात होत्या
या मुलींच्या शाळेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सोशल कनेक्ट ग्रुपने सोशल मिडियावर मुलींसाठी सायकल देण्याचे आवाहन केले